
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, कष्टकरी ,शेतकरी, कामगार, दलित, श्रमिक, बहुजन समाजाचा महाराष्ट्र राज्य विधानसभेतील बुलंद आवाज, जनतेच्या प्रश्नावर विधिमंडळात आणि रस्त्यावरील आंदोलनात धडाडणारी तोफ,सत्ताधाऱ्यांना जनहिताचे कायदे करण्यास बाध्य करणारे मुरब्बी राजकारणी, ११ वेळा विधानसभेवर निवडून येऊन आमदारकीचा विश्वविक्रम करणारे,महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री ॲड. डॉ. भाई गणपतराव देशमुख यांना गांधी चौकात डाव्या आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
डाव्या आघाडीचे घटक पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पक्षांच्या वतीने भाई गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, रोहिदास राऊत,काॅ.देवराव चवळे,काॅ.रमेश उप्पलवार,प्रा.प्रकाश दुधे, जयश्रीताई वेळदा,भाई शामसुंदर उराडे, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन चे संदिप राहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई गणपतराव देशमुख अमर रहे, भाई गणपतराव देशमुख यांना लाल सलाम अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाई अक्षय कोसनकर,भाई सुनील कारेते, विजया मेश्राम, चंद्रकांत भोयर, पुष्पा कोतवालीवाले, मनिषा हजारे,शालू आभारे,रजनी खैरे,धारा बन्सोड, आशा थोराक,सुधा बांबोळे, वेणू लाटकर,सुलका बोबाटे उपस्थित होते.