मडवेली जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक, नक्षलवाद्यांचे होते शिबिर; घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळला

विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे.
१९ सप्टेंबरला उपविभाग भामरागडअंतर्गत येणाऱ्या पोमके ताडगाव हद्दीतील मडवेली जंगल परिसरात गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. बहादुर जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

21 सप्टेबर 2021 रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावुन मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे 35 ते 40 नक्षलवादी शिबीर लावून असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, मोठया प्रमाणावर पिट्टू व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. आयईडी व कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असुन जवानांनी नक्षलविरोधात महत्वपुर्ण कारवाई करत नक्षलवादयांचा नक्षलवाद्यांचा मोठा शिबीर उधळुन लावण्यात यश मिळविले आहे. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.सोमय मुंडे सर,अपर पोलीस अधीक्षक अहेरी (अभियान) श्री. मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक.श्री समीर शेख सर (प्रशासन), सी-60 प्रभारी अभिजीत पाटील यांनी सदर नक्षल विरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी अथक परीश्रम घेतले.
विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे संकेत दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles