पोलिस असल्याचे भासवून वर्तमानपत्रात कार्यरत कर्मचाऱ्याकडून ब्लॅकमेलिंग, गडचिरोलीतील धक्कादायक प्रकार; चर्चेला उधाण

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूविक्री सुरू आहे, हे उघड सत्य आहे. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आणि राज्य उत्पादन शुल्क, दारूबंदीशी संबंधित विभाग व पोलिसांनी यात प्रचंड दुर्लक्षितपणा बाळगल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील ‘अर्थकारण’ सर्वज्ञात असताना आता गडचिरोली शहरात एक मोठा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. एका हिंदी भाषिक वर्तमानपत्रात कार्यरत कर्मचाऱ्याने (पत्रकार नाही) आपण स्वतः ‘पोलिस’ असल्याचे सांगून गोकुळनगरातील एका अवैध दारूविक्रेत्याला धमकावले. एवढेच नव्हे तर, सहकारी एका जीवलग पोलिस मित्राला सोबत घेऊन घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर विशिष्ट रक्कम उकळण्यासाठी त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक दबाव टाकला. मात्र काहीच हाती न लागल्याने त्यांना आल्यापावली परतावे लागले. याबाबत उघड बोंब झाल्यानंतर मोठ्या चर्चेला पेव फुटले असून दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी ‘ब्लॅकमेलिंग’चा हा गोरखधंदा कधीपर्यंत चालणार आणि कोण खपवून घेणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘मराठी इ-न्यूज नेटवर्क’ ने याबाबत अधिक माहिती घेतली असता, अतिशय गंभीर बाब निदर्शनास आली. प्राप्त चर्चा व माहितीनुसार, गडचिरोली शहरातील गोकुळनगर भागात एक अवैध दारूविक्रेता आहे. याची माहिती मिळताच हा हिंदी भाषिक वर्तमानपत्रात कार्यरत कर्मचारी ‘पोलिस’ असल्याचे सांगून त्याच्या घरी धडकला. मात्र तत्पूर्वी त्याने संबंधित दारूविक्रेत्याशी मोबाइलवर संभाषण केले, त्यात त्याचे दोन्ही संपर्क क्रमांक स्पष्टपणे उजेडात आले. दारूविक्रेत्याच्या घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या सहकारी पोलिस मित्राला तिथं पाचारण केले आणि घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी काहीच हाती न लागल्याने शेवटी त्यांनी विशिष्ट रक्कमेची मागणी केली. त्यासाठी त्यांनी संबंधित व्यक्तीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. यानंतर संबंधिताने आक्रमक भूमिका घेतल्यावर या महाशयाने तिथून काढता पाय घेतला. मात्र अजूनही हे प्रकरण सध्या गडचिरोलीत प्रचंड चर्चिल्या जात आहे. याबाबत सखोल चौकशी झाल्यास संबंधित व्यक्तीचा उलगडा होऊ शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles