‘मी आणि माझे स्वास्थ’ मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा

‘मी आणि माझे स्वास्थ’ मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, बेसा, नागपूर व ग्रेशियस इंस्टिट्युट ऑफ मेडीकल साइन्सेस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 मे 2022 रोजी महिलांच्या आरोग्यासाठी आंतराष्ट्रीय कृती दिनानिमित्य वेळाहरी ग्रामपंचायत, नागपूर येथील परिसरातील नागरिकांकरिता ‘मी आणि माझे स्वास्थ्य’ ही मोहिम राबविण्यात आली.

सदर मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला ग्रेशियस इंस्टिट्युट ऑफ मेडीकल साइन्सेस, नागपूर चे तज्ञ चिकित्सक डॉ. निखील धांडे, डॉ. अश्विनी धांडे व डॉ. जयश्री राठी व परिचारिका हे उपस्थित असून यांनी वेळाहरी ग्रामपंचायत परिसरातील महिला नागरिकांचे रक्तदाब, मधुमेह, उंची, वजन करून त्यांच्या आरोग्याची तपासणी केली व मोफत औषधीचे वितरण करण्यात आले.

तसेच महाविद्यालयातील विद्यार्थीनींद्वारे ‘मी आणि माझे स्वास्थ्य’ या मोहिमेअंतर्गत येथील महिला नागरिकांना मासिक पाळीसंबंधी स्वच्छतेची माहिती, त्यांना आवश्यक पोषक आहार (शेंगदाना चिक्की, राजगिरा लड्डू व पाच धान्य सत्तु) व सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. वेळाहरी ग्रामपंचायत अंतर्गत एकुण 72 महिला नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. त्याचबरोबर या महाविद्यालयाद्वारे वेळाहरी ग्रामपंचायत परीसरातील गरजु मुलांना शैक्षणिक साहित्यांची कीट सुध्दा वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील महिला विकास विभागाचे समन्वयक प्राध्यापक सौ. रूची शिवहरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्राध्यापक डॉ. अजय पिसे यांनी केले असून या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वेळाहरी ग्रामपंचायत चे सरपंच श्री सचिन इंगळे यांचा महत्वपुर्ण सहभाग लाभला व तसेच महाविद्यालयाचे संस्थाप्रमुख श्री मनोजजी बालपांडे यांच्या मार्गदर्शनामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. उज्वला महाजन, प्राध्यापक डॉ. विद्या साबळे, कु. विजया रबडे, श्री सचिन मेंढी, कु. अश्विनी इंगोले, कु. गायत्री तिवस्कर व इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles