हिंगणा वनपरिक्षेत्रांतर्गत ‘जागतिक पर्यावरण दिवस’ उत्साहात साजरा

हिंगणा वनपरिक्षेत्रांतर्गत ‘जागतिक पर्यावरण दिवस’ उत्साहात साजरा
नागपूर :- जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वनपरिक्षेत्र हिंगणा अंतर्गत अंबाझरी जैवविविधता उद्यान येथे आज दि ५ जून रोजी वेगवेगळे उपक्रम राबवून ‘जागतिक पर्यावरण दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. ‘युएनओ’च्या संकल्पने प्रमाणे The One Earth ही संकल्पना राबवून प्रामुख्याने प्लास्टिक निर्मूलन, वृक्ष लागवड व पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम करण्यात आला.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अंबाझरी जैवविविधता उद्यानात सदर कार्यक्रमाचे हे यशस्वी ९ वे वर्ष असून दर वर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमांत निसर्ग प्रेमी आणि नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. नागपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक (प्रा.) नागपूर रंगनाथ नाईकडे सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी त्यांनी ‘वृक्ष संरक्षण’ व ‘संगोपन’, तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. एस.टी.काळे, सहाय्यक वनसंरक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन कु.रीना पी. राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगणा यांनी केले. आशिष निनावे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण निर्मूलन नागपूर यांनी अमूल्य सहकार्य केले.

तसेच या कार्यक्रमाला कुंदन हाते, सदस्य राज्य वन्यजीव मंडळ महाराष्ट्र, अविनाश लोंढे, अजिंक्य भटकर, उदयसिंह यादव, मानद वन्यजीव रक्षक नागपूर, विनित अरोरा, सृष्टी पर्यावरण मंडळ नागपूर, श्री.व्यंकटेश मुदलीयार, बर्डस आॅफ विदर्भा, तसेच खालील प्रमाणे ग्रुपचे सर्व मेंबर्स उपस्थित होते.

याप्रसंगी इंडियन वाइल्ड लाइफ ग्रुप, अपूर्व विज्ञान मेला, SGST office staff Nagpur, क्षेत्रीय मराठा कलार संघ नागपूर तसेच NCC ग्रुप नागपूर. सर्व निसर्गप्रेमी व सर्प मित्र मोनूभाऊ सिंग , व चेतन बेहाडे सर्व वनकर्मचारी हिंगणा यांच्या उपस्थितीत ‘जागतिक पर्यावरण दिना’चा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles