‘बीआरएसपी’चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारकांसाठी एल्गार

‘बीआरएसपी’चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारकांसाठी एल्गार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर – भारतीय घटणनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १९९१ – ९२ ला जन्मशताब्दी भारतासाह जगात सर्वत्र साजरी करण्यात आली. या निमित्त डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ अनेक उपक्रम, प्रकल्प, योजना राबविण्याचा संकल्प केला गेला. नागपूर महानगर पालिकेनेही १९९२ मध्ये सभागृहात एकमताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक धंतोली येथे पटवर्धन मैदानात भव्य स्मारक उभारण्याचा ठराव पारित केला. पण आज ३० वर्षे उलटूनही स्मारक बांधकाम सुरूही झाले नाही.

याउलट अंबाझरी उद्यान लगत असलेली ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडर सभागृह पाडण्यात आले. याविरुध्द जनतेमध्ये रोष आहे. हाच मुद्दा घेऊन बीआरएसपीने एल्गार पुकारला आहे. बी. आर. एस. पी. तर्फे आज संविधान चौक येथे नागपूर महानगर पालिका विरुध्द जोरदार नारे- निदर्शन करून निषेध नोंदवला व स्मारकारचे काम त्वरित सरू करावे अशी मागणीचे निवेदन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना देण्यात आले.

तत्पूर्वी ८ व ९ जून रोजी उत्तर नागपूर मध्ये कमाल चौक व भीम चौक येथे व दक्षिण-पश्चिम, दक्षिण मध्ये जाटतरोडी व त्रिशरण चौक व पश्चिम नागपूर मध्ये सम्राट अशोक चौक येथे ही जोरदार नारे- निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे, प्रदेश महासचिव रमेश पाटील, संयोजक डॉ. जे. बी. रामटेके, विश्रांती झांबरे, डॉ. विनोद रंगारी, वंदना लांजेवार यांनी केले.

या आंदोलनात अॅड. भीमराव शेन्डे, एस. टी. पाझारे, सी.टी.बोकर, पंजाबराव मेश्राम, एस.एस. मेश्राम, डी. एम. सोनडवले, दिलीप पाझारे, आशीर्वाद कापसे, सी.डी. वाघमारे, कमल किशोर, विलास पारखंडे, वासुदेव मेश्राम, तुलसीदास मंडपे, शिंगाडे आई, शोभा तिरपुडे, मायाताई मेश्राम, यशोधरा नानवटे, प्रविण खापर्डे, रेखा मेश्राम, लिनता लाले, लीनता लाले, अशोक बागडे, किशोर सोमकुवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles