
बत्ती गुल, विजेचा लपंडाव सुरूच, नागरिक त्रस्त
नागपूर : दक्षिण नागपुरात मानेवाडा परिसरातील सरस्वतीनगरात शनिवारी रात्री १० वाजून ४५ मिनटांनी अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने सरस्वती नगरातील नागरिक रात्रभर अंधारातच होते. शहरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. दिवसा रात्री कधीही बत्ती गुल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून बत्ती गुल होण्याचे सत्र सुरूच आहे. दिवस-रात्र केव्हाही वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. वस्तीतील नागरिक गर्मी मुळे परेशान असून वस्तीतील लोकांना संपूर्ण रात्र जागून सकाळ बघावी लागली. ग्राहकांनी शनिवार च्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी, तक्रार केली. परत सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी तक्रार करून सुद्धा वीज पुरवठा झालेला नाहीत.
नागरिकांनी वस्तीतील महावितरणला रात्री दोन ते तीन वेळा तक्रार देऊन सुद्धा महावितरणने कारवाई केलीच नाही. करिता यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी नागरिकांची मागणी आहे