कुलगाममध्ये बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

कुलगाममध्ये बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जम्मू काश्मीर: सुरक्षा दलाकडून आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून सातत्याने शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलाने ‘ऑपरेशन ऑलआऊट’ हाती घेतले असून दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या जवानांना संयुक्त मोहिमेअंतर्गत शोपियानच्या कांजीउलर भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर कारवाई दरम्यान दोन दाहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसंबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यातील जान मोहमद लोने हा २ जून रोजी कुलगाममध्ये करण्यात आलेल्या बँक मॅनेजरच्या हत्येत सहभागी होता.

दोन दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये २४ तासांत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला आणि पोलिसांना यश मिळालं होतं. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे होते. काश्मीरमधील पोलीस, सुरक्षा दलांवर हल्ले आणि इतर हिंसक घटनांमध्ये हे दहशतवादी सहभागी होते. गेल्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम अधिक तीव्र केली होती. यंदाच्या वर्षी १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles