दादरा नगर हवेलीच्या ज्ञानमाता शिक्षण संस्थेत दहावीच्या १००% निकालाची परंपरा कायम

दादरा नगर हवेलीच्या ज्ञानमाता शिक्षण संस्थेत दहावीच्या १००% निकालाची परंपरा कायमपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सिलवासा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली येथील ज्ञानमाता शिक्षण संस्थेने महाराष्ट्र बोर्डात यंदाही आपल्या १००% निकालाची उज्वल परंपरा कायम राखण्यात यश प्राप्त केले आहे.

ज्ञानमाता शिक्षण संस्थेच्या संत फ्रान्सिस झेवियर हायस्कूल दुधनी, दादरा नगर हवेली येथील इयत्ता 10 वी चा निकाल 100% लागला असून, प्रथम क्रमांकाने कु.सुशांत संदीप गवळी हा शेकडा 81.60% गुण, द्वितीय क्रमांकावर कु.रोशन काकड 80.60 गुण तर तृतीय क्रमांकावर कु. अमर गडग 79% गुण प्राप्त करून प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे.

ज्ञानमाता संस्थेने दरवर्षी प्रमाणे उज्वल निकालाची परंपरा यावर्षी पण कायम ठेवली आहे. दादरा नगर हवेली मधील अत्यंत ग्रामीण भागातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दुर्गम भागातील या शाळेत सर्व विद्यार्थी आदिवासी आहेत. या उज्वल निकालासाठी शाळेचे मॅनेजर फा. सिल्वेस्टर, मुख्याध्यापक फा.वॉल्टर, शिक्षक प्रशांत ठाकरे, रमाकांत पाटील, विलास लोतडा यांचे ज्ञानमाता एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय दुधनी येथील शाळेतील शिक्षकांना दिले आहे.

_फातिमा माता हायस्कूल वेलूगामच्या विद्यार्थ्यांचे सुयश_

ज्ञानमाता शिक्षण संस्था, दादरा नगर हवेलीच्या फातिमा माता हायस्कूल वेलूगाम येथील दहावीचा निकाल १००% लागला असून, वेलूगाम हायस्कूल मधून प्रथम क्रमांक कुमारी जागृती मिलिंद भावर 87.40 %टक्के, द्वितीय क्रमांकावर कुमारी नईता मधु भावर 82.40% टक्के तर तृतीय क्रमांकावर कुमार हितेश जिव्या शनवार याला 80.60 टक्के गुण प्राप्त करून वेलूगामच्या १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे फातिमामाता हायस्कूल वेलूगामच्या नूतन मुख्याध्यापिका सिस्टर लविनिया अल्मेडा यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे यासाठी शिक्षिका सविता पाटील ठाकरे, जानी घुटे व प्रफुल महाला यांनी अनमोल मार्गदर्शन केले. फातिमामाता एज्युकेशन सोसायटी तर्फे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंदाचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles