‘तुम्ही एकदा या, आम्ही वारंवार येऊ; सागर करंडे

‘तुम्ही एकदा या, आम्ही वारंवार येऊ; सागर करंडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नाट्यरसिकांचा एक वेगळा वर्ग आहे_

नागपूर: ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाच्या प्रयोगासंदर्भात आज प्रसिद्ध अभिनेता व नाट्यकलावंत सागर करंडे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की नाट्यरसिकांचा एक वेगळा वर्ग असून ओटीटीवर चित्रपट प्रसारणाचा जो सध्या कल आहे. त्याचा काहीही फरक नाट्यप्रयोगावर पडलेला नाही. नागपूरकरांनी एकदा हे मनोरंजक नाटक बघायला एकदा या, आम्ही वारंवार नागपूरच्या प्रेक्षकांसाठी संत्रानगरीत येऊ’ असे आवाहन नागपूरकरांना सागर करंडे यांनी केले.

रविवार १९ जूनला डॉ. देशपांडे सभागृह येथे दुपारी २ वा व सायंकाळी ५.३० वा. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचे प्रयोग होणार असून ते नि:शुल्क ठेवण्यात आले असल्याचे संजय भरडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. नवरंग क्रिएशन्स ही सांस्कृतिक क्षेत्रात सात्यत्याने मराठी व्यावसायिक मराठी नाटक आयोजीत करणारी रागपुरातील एक अग्रगण्य संस्था असून मागील १५ वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात कार्यरत आहे. संस्थेतर्फे मागील १५ वर्षात नाट्यरसिकां करिता अनेक अप्रतिम व्यावसायिक नाटकांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे.

नाट्यरसिकांनी देखील त्याला भरघोस प्रतिसाद देऊन आमचा उत्साह द्विगुणित केला. याच परंपरेला कायम ठेवून येत्या रविवार दि १९जून ता डॉ. देशपांडे सभागृह येथे नवरंग क्रिएशन्स व मी टू वुई या दोन सामाजिक संस्थानी मिळून ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या धमाल विनोदी नाटकाच्या २ प्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles