हिंगण्यात गुणवत्ता यादीतील तीन विद्यार्थीनींचा सत्कार

हिंगण्यात गुणवत्ता प्राप्त यादीतील तीन विद्यार्थीनींचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_तालुक्यातील शिरपेचात मानाचा तुरा_

सतीश भालेराव, नागपूर

नागपूर: महाराष्ट्र उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदाही या परीक्षेत मुलींनी बाजी मारली. हिंगणा तालुक्यातही नागपूर महानगर पालिकेच्या शाळेतून प्रथम आलेली कु. प्रगती पूजा-सुरेंद्र मेश्राम, लिटिल स्टार कॉन्व्हेंटची कु.नमस्वी दिपाली- रवींद्र हुमणे व वानाडोंगरीच्या शासकीय मुलींच्या निवासी शाळेतील कु.शांक्षिती नंदा-किशोर बारसागडे इसासानी या तिनही मुलींनी गुणवत्ता यादीत येऊन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थीनींचा १८ जून रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

कु.प्रगती धीरेंद्र मेश्राम ही ईसासनीच्या शांतीनगरातील निवासी असून जयताळा येथील मनपाच्या शाळेची विद्यार्थिनी आहे. ही नागपूर शहरातील मनपाच्या सर्वच शाळेतून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा चारही भाषेच्या विभागातून ९२.६०% घेऊन सर्वप्रथम आली आहे. नमस्वी दिपाली-रविंद्र हुमणे ही इसासनीच्या छत्रपती संभाजी नगर येथील निवासी असून ही सीआरपीएफ गेटच्या लिटिल स्टार कान्वेंटची विद्यार्थिनी आहे. ही ९३.२०% घेऊन सर्वप्रथम आली आहे. नमस्वी ही यापूर्वी बुद्धिस्ट इंटरनेट नेशनल स्कूलची विद्यार्थिनी होती.शांक्षीती नंदा-किशोर बारसागडे ही इसासनी भिमनगर झेंडा चौकची निवासी असून वानाडोंगरीच्या शासकीय मुलींच्या निवासी शाळेची विद्यार्थिनी आहे. ही ९१.४०% घेऊन प्रथम आली आहे.

ईसासनी या वसाहतीने प्रगती मेश्राम, नमस्वी हुमणे, शांक्षिती बारसागडे ह्यांचे सहित अनेक गुणवंत (मेरिट) यावेळी दिले आहेत. प्रगतीने एमबीए करुन फायटर पायलट बनण्याचे, नमस्वीने डॉक्टर बनून आयएएस बनण्याचे तर शांक्षीतीने जज बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी बसपा ने तन-मन-धनाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे अभिवचन दिले.

गुणवत्ता प्राप्त विद्यार्थीनींच्या सत्कार प्रसंगी बसपाचे प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, जिल्हा सदस्य सुरेश मानवटकर, नागपूर जिल्हा महिला आघाडीच्या महासचिव सुनंदाताई नितनवरे, शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे, हिंगणा विधानसभा अध्यक्ष महेश वासननिक, दक्षिण-पश्चिम नागपूर चे प्रभारी शिवपाल नितनवरे, इसासनीचे दिनेश वासनिक, सुरेंद्र शेंडे, विकास गोपनारायण, दिलीप रामटेके, रवींद्र हुमणे, किशोर बारसागडे आदी सर्व माजी पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles