
फिरंगोजी व अंनतशांतीच्या वतीने ३० विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप
_ऐनी धाऊरवाडा, धनगरवाडा शाळेतील स्तुत्य उपक्रम_
सुभाष चौगले,कुडूत्री(प्रतिनिधी)
कोल्हापूर: जिल्ह्यातीथ वाडी वस्ती व दुर्गम भागातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड आणि गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने मुलांना कोणत्यातरी रूपात मदत मिळावी. यासाठी समाजातील अनेक सामाजिक संस्था हातभार लावत असतात. राज्यभर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या फिरंगोजी आणि अनंतशांती संस्थेच्या वतीने नुकतेच ऐनी धाऊरवाडा व धनगरवाडा येथील परिसरातील ३० विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.
वाड्या-वस्त्यातील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.महमंद यासिन शेख व अनंतशांती संस्थापक अध्यक्ष मा.भगवान गुरुव यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम पार पडला.
संस्थेच्या वतीने अति दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागाची निवड करून संस्था दरवर्षी शालेय विद्यार्थी यांचेसाठी स्वखर्चाने मदत करते. गेल्या तेरा वर्षांपासून हे काम अखंडपणे सुरू आहे. काल ऐनी धाऊरवाडा व धनगरवाडा या अतिदुर्गम भागाची निवड करून या परिसरातील ३० विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. रेनकोट वाटप कार्यक्रमास आकाश पाटील, रवींद्र काळे कालिदास जाधव, केदार पाटील, रोहिदास दाभाडे, यांचेकडून आर्थिक सहकार्य लाभले.
याप्रसंगी मुख्याध्यापक मोहन सुतार सरसव दीपक शेंडगे सर यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमास फिरंगोजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद प्रमोद पाटील,अंनतशांतीचे राधानगरी – भुदरगड अध्यक्ष सुभाष चौगले यांच्या हस्ते रेनकोट वाटप करणेत आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक मोहन सुतार सर, मुख्याध्यापक पांडुरंग ढवण सर, शिक्षक मनोज पोवार, दीपक शेंडगे,विराज सरनाईक तसेच परिसरातील ग्रामस्थ,पालक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते.