प्रशिक्षणपूर्व स्वयंरोजगार व व्यवसायिक प्रशिक्षण

प्रशिक्षणपूर्व स्वयंरोजगार व व्यवसायिक प्रशिक्षण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️नंददत डेकाटे //नागपूर जिल्हा प्रतिनिधी

भिवापूर: महिला व बालकल्याण विभाग आणि उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती, भिवापूर अंतर्गत दिनांक 18 जून रोजी शनिवारला सकाळी 10.00 वाजता पंचायत समिती सभागृह, भिवापूर येथे कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षणपूर्व स्वयंरोजगार व व्यवसायिक प्रशिक्षण ओळख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रीमती नेमावली माटे यांचे हस्ते पंचायत समिती सभापती श्रीमती ममता शेंडे, पंचायत समिती सदस्य श्री. राहुल मसराम, श्रीमती माधुरी देशमुख, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. शेखर गजभिये, महिला व बालविकास अधिकारी ईश्वर लखोटे यांचे उपस्थितित पार पडले.

यावेळी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे मनीष कुदळे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कु. शिवानी गायकवाड यांनी महिलांना शेळीपालन, शिवणकाम, ब्युटी पार्लर,अगरबत्ती मेकींग यासह स्वयंरोजगारबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन कु.आरती तिमांडे यांनी तर आभारप्रदर्शन तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उमेदचे कु. दुर्गा नुनावत, चिरंजीत बुरांडे व महिला बालकल्याणचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles