आज दिलीप माजगावकर यांची प्रकट मुलाखत
नागपूर: विदर्भ साहित्य संघाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी साहित्यविश्वातील आघाडीच्या राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचे दि २५ जून रोजी सांय. ६.०० वाजता विदर्भ साहित्य संघाच्या ‘अमेय’ दालनात आयोजित करण्यात आले असून, नागपुरातील साहित्यप्रेमींनी विदर्भ साहित्य संघाच्या सांकृतिक संकुल चौथा मजला, झाशी राणी चौक, सीताबर्डी नागपूर येथे उपस्थित रहावे.