पदपथावर साजरा आगळावेगळा वाढदिवस…!

पदपथावर साजरा आगळावेगळा वाढदिवस…!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर

वाढदिवस म्हटलं तर तरूणाईचा जल्लोष… पार्टी नाचगाणे बेहोश…पण यातही जागरूक राहून समाजाप्रती ऋण फेडणाऱ्यांची या भारत देशात कमतरता नाही. असाच एक आगळावेगळा वाढदिवस सोहळा जून महिन्याच्या सतरा तारखेला चंद्रपूरातील काही युवकांनी साजरा केला.

वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू तसेच खेळणी विकणारी भटक्या समाजातील अनेक कुटुंबे शहरोशहरी पदपथावर वास्तव्यास असतात. उदरनिर्वाहाचाच यक्षप्रश्न असताना वाढदिवस, सणवार, हौसमौज या तर त्यांच्यासाठी दूरच्याच गोष्टी. पण पुरुषोत्तम रामगिरकर, हर्ष हुकरे, दीपाली हुकरे, श्रुती सातपुते, पुरूषोत्तम आटमांडे आणि आयुष कोडापे या ध्येयवेड्या मुलामुलींनी अशाच एका कुटुंबातील निरागस मुलाचा वाढदिवस त्यांच्यासोबत केक कापून साजरा केला आणि तरूणाईपुढे एक आदर्श ठेवला.

ते फक्त वाढदिवस साजरा करुन थांबले नाहीत तर त्या कुटुंबासाठी किराणादी धान्य, छोट्या मुलांसाठी वह्या, खाऊ, ज्यूस यांचेही त्यांनी वाटप केले. त्यांच्यासोबत आपला अमूल्य वेळ घालविला. गप्पागोष्टी करून त्यांचे काही क्षण आनंदीत केले.

अशा या तरूणाईच्या प्रतिनिधीत्वाचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा…!

वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles