
बी .डी .धुरंधर “राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने” सन्मानित
सांगली: दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणीसंवर्धन अभियान “बुलढाणा जिल्हा समन्वयक” बी डी धुरंधर यांनी केलेल्या पर्यावरण व पशुपक्षी संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणी संवर्धन अभियान तसेच पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय सांगली, उप वनसंरक्षक कार्यालय सांगली, प्राणीक्लेश प्रतिबंधक सोसायटी सांगली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पर्यावरण व पशुपक्षी संवर्धन काळाची गरज: या राज्यस्तरीय इस्लामपूर जिल्हा सांगली येथील कार्यशाळेत “राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले .
बी डी धुरंधर हे उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख याच बरोबर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटन सचिव, या पदावर कार्यरत असून दिशा निसर्ग पर्यावरण व पशुपक्षी संवर्धन अभियानामध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये भरीव आणि उल्लेखनीय कार्य केल्यामुळे , दिशा निसर्ग पर्यावरण व पशुपक्षी संवर्धन अभियानाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्राध्यापक विशाल जाधव, मा.आमदार (विधानपरिषद) भगवानराव साळुंखे, मा. विलास काळे, विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण सांगली, डॉ. एस ए धकाते, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सांगली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत इस्लामपूर जिल्हा सांगली येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे बी डी धुरंधर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.