धनगर समाज संघटनेतर्फे अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) यांना निवेदन

धनगर समाज संघटनेतर्फे अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) यांना निवेदन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_महिला पोलीसांवर हल्ला करणा-यावर कठोर कारवाई व्हावी_

गजानन ढाकुलकर, नागपूर प्रतिनिधी

नागपूर :- धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर, महाराष्ट्र राज्यतर्फे नविनचंद्र रेड्डी साहेब अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पोलीस भवन नागपूर यांना महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरावर कठोर कारवाई करणेबाबत आज दि ११ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे.

पोलीस कर्मचारी राधा पडवे यांच्यावर झालेल्या जीवघेणी हल्याबाबत साहेबांशी सविस्तर चर्चा करण्यात आली, साहेबानी लगेच फोन करून श्रीमती राधा पडवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यांची हॉस्पिटल मध्ये जाऊन संपूर्ण चौकशी करण्यात यावी त्याची माहिती लगेच कळवावी असे आदेश गिट्टीखदान पोलीस स्टेशनला देण्यात आले.

दरम्यान,सत्यावर गिट्टीखदानचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विम्स हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेऊन पेशंट विषयी संपूर्ण माहिती घेण्यात आली, तसेच आरोपीला लाल बिल्डींग नंबर ५ येथील क्वार्टर नंबर १४२ खाली करायचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. आणि आरोपी संदिप पौणिकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्याला बडतर्फ करण्यात येईल असा लवकरच निर्णय घेण्यात येणार अशी माहिती दिली.

श्रीमती राधा पडवे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच आरोपीवर तात्काळ गंभीर कारवाई करून, आरोपीला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर,महाराष्ट्र राज्य कडून करण्यात आली आहे. निवेदन देताना धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे सचिव श्री शरद उरकुडे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष यशवंत कातरे , डॉ प्रवीण पडवे साहेब उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles