कोरोना काळात एकल झालेल्या महिलांच्या १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

कोरोना काळात एकल झालेल्या महिलांच्या १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, नागपूर प्रतिनिधी

हिंगणा :- स्थानिक प्रेरणा विकास सोसायटी, हिंगणा अंतर्गत आज दि ११ जुलै रोजी महाजनवाडी येथे कोरोना काळात एकल झालेल्या महिलांच्या १० वी व् १२ वी उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींचा सत्कार आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी अध्यक्ष श्री. सुनीलजी बोंदाडे (पं स सदस्य,हिंगणा ),प्रमुख पाहुणे CDPO विश्वासजी सलामे (महिला व बाल कल्याण विभाग, हिंगणा) नागसेन फुलझेले (संरक्षण अधिकारी, हिंगना), किशोर बारापात्रे ( LIC विमा सल्लागार) ,पद्माकर बुरनुरे आणि एकल महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक पद्माकर बुरणुरे( प्रेरणा विकास सोसायटी) यांनी केले,श्री.सतीश फुलझेले यांनी कोरोना एकल पीडित अत्याचारग्रस्त महिला व न्याय कसा मिळवायचा या संदर्भात माहिती दिली, CDPO विश्वासजी सलामे यांनी बाल संगोपन, सानुग्रह योजना (५०००० रु.), शैक्षणिक फी (१०००० रु.) व प्रशिक्षण ब्युटीपार्लर,शिवणक्लास तसेच कोरोना एकल महिलांचे बचतगट बनविणे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

किशोर बारापात्रे यांनी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या LIC विमा धारकांना विम्याचे पैसे मिळवून देण्यात मदत केली व LIC च्या नवीन योजने संदर्भात माहिती दिली,अध्यक्ष सुनिलजी बोंदाडे यांनी एकल महिलांना एकत्र येऊन व संघटन तयार करा या विषयी मार्गदर्शन केले. तसेच कोरोना काळात एकल झालेल्या महिलांच्या १० वी व् १२ वी उत्तीर्ण पाल्य व् पालकांचा सत्कार वैशाली बुरांडे व पाल्य पंकज बुरांडे,सविता बनसोड व पाल्य स्नेहा बनसोड, मुरलीधर कोरडे व पाल्य जानवी कोरडे आणि रजनी मून व पाल्य ओम मून यांचा सत्कार उपस्थित मान्य वारांच्या हस्ते पुष्प व शिल्ड देउन करण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता आशा बुरनुरे (कोरोना एकल महिला तालुका समनव्ययक व सचिव प्रेविसो ) यांनी उपस्थित मान्यवर सदस्य आणि महिलांचे आभार मानले. कार्यक्रमा करीता उपस्थित महिला अर्चना जाधव,सविता धवराळ,मनीषा खटके,माधुरी भागवत,लता डेकाटे,सारिका जोगदळ,वैशाली वानखेडे,विशाखा देवगडे,मीना कोटगुले आणि इतर महिला उपस्थित होत्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles