
बहरच्या निमित्ताने…..अनुभवलेले क्षण (भाग : २)
अशोकदादांची धावपळ….आणि लांडगे ताईंच्या हातचा पाहुणचार…!
✍️वैशाली उत्तम अंड्रस्कर
तुकुम ता. जि. चंद्रपूर
नेवासा फाटा येथे उतरल्यानंतर अशोकदादा मला श्रीक्षेत्र देवगड येथे घेऊन गेले. मात्र भक्तनिवासाच्या नियमानुसार एकटीला खोली मिळू शकली नाही. अशोकदादांनी मग घरी चलण्याचा आग्रह केला. त्यांच्याकडे जाऊन स्नानादी आन्हिके उरकली. कांदेपोहे , गोड शिऱ्याचा नाश्ता करुन मी माझे जरा लेखनकार्य केले. तोवर सौ. लांडगेताईंनी गरमागरम भाकरी आणि शेवग्याच्या आमटीचा बेत केला . तोवर कल्पनाताई शाह , ठाणे यांचेसुद्धा आगमन झाले. दोघींनीही गप्पागोष्टी करत जेवण आटोपले आणि पूर्वनियोजित देवगड निवासस्थानी जाण्याची तयारी केली. अशोकदादांनी आम्हाला फाट्यावर येऊन रिक्षा शोधून दिली. कल्पनाताई आणि मी दोघीही रिक्षात बसलो आणि श्रीक्षेत्र देवगडकडे प्रस्थान केले. (क्रमशः )
वैशाली उत्तम अंड्रस्कर
तुकुम ता. जि. चंद्रपूर