Home नागपूर जीवन विकास एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी खा. रामदास तडस यांची अविरोध निवड.

जीवन विकास एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी खा. रामदास तडस यांची अविरोध निवड.

176

जीवन विकास एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी खा. रामदास तडस यांची अविरोध निवड.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर_

नागपूर: जिल्ह्यातील एक प्रमुख शिक्षण संस्था “जीवनविकास एज्युकेशन सोसायटी, सिरसपेठ नागपूर “चे अध्यक्षपदी वर्धेचे खासदार रामदास तडस यांची अविरोध निवड झाली. ही शिक्षण संस्था नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. बाबुरावजी झाडे यांनी 1960 ला स्थापन केली असून या संस्थेने नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरातील कामगार व मागास भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे सोयीसाठी त्या त्या भागात शाळा काढल्यात.

हजारो विद्यार्थी या संस्थेच्या शाळेत विनामूल्य शिक्षण घेतात. संस्थेद्वारा १ वरिष्ठ महाविद्यालय, ८ माध्यमिक शाळा, ३ कनिष्ठ महाविद्यालय, १ नाईट शाळा, १ अध्यापक विद्यालय, १ इंग्रजी माध्यमाची कॉनवेंत, १ कम्प्युटर इन्स्टिट्यूट, व मुक्त विद्यापीठ केंद्र या संस्थेद्वारा चालविल्या जाते. संस्थेच्या सर्व शाळा स्वतःच्या मालकीच्या इमारतीत असून, या शिक्षण संस्थेची १०० कोटींच्या वरची प्रॉपर्टी आहे. अनेक गरीब, गरजू, शेतकरी व ग्रामीण भागातील तरुणांना या संस्थेने नोकऱ्या दिल्यात व त्यांचे जीवन समृद्ध केले. नुकत्याच झालेल्या 12 जुलै 2022 ला संस्थेची सन 2022 ते 25 या तीन वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक झाली आहे.

_अविरोध नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे _

१) अध्यक्ष -रामदासजी तडस
२) कार्याध्यक्ष – बाबुराव झाडे
३) उपाध्यक्ष-वसंत झाडे
४) सचिव -राजेंद्र झाडे
५) कोषाध्यक्ष -बळवंत मोरघडे
६)सहसचिव – प्रवीण झाडे
७) सदस्य – नितीन झाडे
८) सदस्य -सौ.माधुरी झाडे
९) सदस्य: मोहनीश झाडे

संस्थेचे तत्कालीन सचिव स्व. विजय वैद्य यांनी खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून बोगस चेंज रिपोर्ट मा.धर्मादाय आयुक्त नागपूर यांचेकडे सादर करून सन 2013 मध्ये संस्थापक बाबूरावजी झाडे यांना व त्यांच्या लोकांना संस्थेतून काढून संस्था बळकावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बाबुराव झाडे व त्यांचे सहकाऱ्यांनी स्व.वैद्य यांचा खोटेपणा उघड करून संस्था सांभाळली. बाबुराव झाडे यांनी १२ जुलै ला 85 व्या वर्षात पदार्पण केलेत. याप्रसंगी बाबुराव झाडे यांचे जीवनावर आधारीत”अजूनही चालतोची वाट”या आत्मचरीत्रपर, डॉ. देवमन कामडी यांनी केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा खा. रामदास तडस यांचे हस्ते करण्यात आले. सध्या संस्थेचे प्रशासन सचिव म्हणून त्यांचा मुलगा राजेंद्र झाडे व कोषाध्यक्ष बळवंत मोरघडे हे सांभाळतात.

मा.खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे सहकार्याने संस्थेचा विकास होऊन, संस्थेला मदत होईल असा विश्वास संस्थापक बाबुरावजी झाडे यांनी व्यक्त केला आहे.