‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’ बेलतरोडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
सतीश भालेराव, नागपूर
नागपूर: शहरातील ‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’ बेलतरोडी येथे दि १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी सकाळी प्रार्थना सभा मराठीत घेण्यात आली. त्यात गुरू महात्म्य सांगण्यात आले. हा दिवस व्यास ऋषींचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.
स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी “गुरुदेव व गुरुभक्त” आरुणीचे नाटक सादर केले. तसेच हिंदीत नुक्कड नाटकाने सर्वांचे मन मोहले. या कार्यक्रमात सर्व “रोज हाऊस”च्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभाग होता. शाळेच्या प्राचार्या केतकी शेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम फारच छान झाला. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या प्राचार्या केतकी शेंद्रे यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतांना संबोधित केले.
याप्रसंगी गीत, संगीत, नाटक, वादन सादरीकरण करण्याऱ्या शाळेतील चिमुकल्यांना प्राचार्यातर्फे शुभ आशिर्वाद दिले. गुरूपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या सर्व शिक्षकांनी एकमेकांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली.