वानाडोंगरी नगर परिषदच्या सुभान ले-आउट मध्ये डुक्करांचा सुळसुळाट
गजानन ढाकुलकर
हिंगणा: वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील सुभान ले-आउट प्रभाग क्र. सहा मध्ये नागरिकांना डुक्करांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी पारशिवणी पॅटर्न वापरून वानाडोंगरी डुक्करमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते.दिलेल्या आश्वासनाची नगरसेवक नगरसेविका यांनी विद्यमान मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांना आठवण करून व डुकराच्या त्रासापासून नागरिकांना मुक्त करावे अशी विनंती सेवानिवृत्त नायब तहसीलदार उदय पाठक यांनी केली आहे.