
पहिल्या महिला आयएएस अन्ना राजम मल्होत्रा
अनिल देशपांडे, बार्शी
सोलापूर: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी होण्याचा मान अन्ना राजम मल्होत्रा यांचा होता. अन्ना यांचा जन्म आजच्या दिवशी केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यामधे झाला होता. कोझीकोड येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्ना यांनी मद्रास विश्विद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. अन्ना या १९५१ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या. त्या मद्रास केडर च्या IAS अधिकारी होत्या.
भारतीय रिजर्व्ह बॅकेचे माजी गव्हर्नर आर.एन. मल्होत्रा यांच्या अन्ना या पत्नी होत्या. मुंबई जवळील जवाहरलाल नेहरु बंदराच्या स्थापनेत अन्ना यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्ष्या म्हणूनही काही काळ काम पाहीले. १९८२ साली दिल्ली येथे भरलेल्या आशियायी स्पर्धांवेली त्यांनी राजीव गांधी यांच्या सोबत काम केले. १९८९ मधे अन्ना यांना पद्मभूषन पुरस्काराने गौरवण्यात आले. राजम मल्होत्रा यांचे १७ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले.