
अमर नगर परिसरात आमदार आरोग्य कार्डचे वाटप
गजानन ढाकुलकर
हिंगणा – भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष कमलेश खोब्रागडे यांचा पुढाकाराने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब व गरजू कुटुंबांना तसेच असंघटित कामगार यांच्या कुटुंबांच्या सदृढ आरोग्यांसाठी आ.समीर मेघे आमदार हिंगणा विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली कमलेशभाऊ खोब्रागडे भाजपा उपाध्यक्ष डिगडोह मंडळ यांच्या पुढाकाराने त्यांच्या हस्ते आमदार आरोग्य कार्डचे अनेक गरजूंना वितरण करण्यात आले.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता रोगराई येणारच व या रोगराईचे निदान लावण्या करिता प्रत्येकाला दवाखान्या विना पर्याय नाही व महागड्या दवाखान्यांचे खर्च गरीब कुटुंबांना व नागरिकांना झेपने शक्य नाही. या सर्व बाबींचा व कामगार वर्गाचा तसेच गरीब नागरिकांचा विचार करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य सेवा ही सर्वात मोठी सेवा असे समजून आमदार समीर मेघे यांच्याद्वारे या कार्डची सुरुवात करण्यात आली.
आरोग्य हीच मोठी सेवा समजून एम.आय.डी.सी.त काम करणाऱ्या नागरिकांना मिळणारा मोजका व तुटतपुंजीचा पगार आणि त्यात परिवाराचे पालन-पोषण करणे ही सर्वात मोठी जबाबदारी लक्षात घेऊन आणि महागड्या दवाखान्याचा ग्रामीण भागातील कामगार वर्गांना व गरीब कुटुंबांना न झेंपणारा खर्च विचारात घेतला व हे कार्ड त्यांच्यासाठी एक संजीवनी म्हणून रामबाण उपाय ठरेल या विचाराने भाजपचे कमलेश खोब्रागडे यांनी आमदार समीरजी मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आरोग्य कार्डचे वितरण केले. यावेळी समवेत राजकुमार मूर्खे, ओमप्रकाश वैद्य, अजय राहिले, राज गायधने, भगवान बालपांडे व अन्य नागरिक व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.