साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन
नागपूर: समाजवादी कामगार सेल महाराष्ट्र च्यावतीने साहित्यरत्न साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृति दिवस निमित्त यांच्या पुतड्याला समाजवादी कामगार सेल चे प्रदेश अध्यक्ष रविकांत खोब्रागडे यांनी पुष्पमाल्यापर्ण करून अभिवादन केले. याप्रसंगी कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सागर बत्तुलवार, प्रदेश संघटक प्रेमसिंग पुरखे, विदर्भ संघटक नानाभाऊ चव्हाण, चिंतामणजी तागडे, सुनिल वानखेड़े, रितीक वानखेड़े, बाबा पाटील, उत्तम दास, नकुल ढोके या समाजवादी कामगार सेल च्या कार्यकत्यांनी अण्णा भाऊ साठे यांना पुष्प माला अर्पण करुन अभिवादन केले.