मनातली शब्दसुमने

मनातली शब्द सुमने



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सस्नेह नमस्कार…
आज आपल्या ‘साहित्यगंध’ चा सुवर्ण महोत्सवी अंक हाती येणार आहे. सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘मायबोली मराठी भाषा आहे जगती महान
संस्कार आणि संस्कृतीची ती एकमेव द्वितीय खाण
‘साप्ताहिक साहित्य गंध ‘ने जपलाय तिचा अभिमान
वाचून लेख साप्ताहिकातले वेचले मराठीचे शिलेदार समूहाने आनंदाचे क्षण’

अंक 1, 2, 3…पासून 49 वा अंक जेव्हा हाती येतं होता, तेव्हा एक दोन दिवसातच एक आदर्श वाचक बनून आम्ही वाचन करीत गेलो. आपला हा अंक अथांग सागर रुपी जीवन नौकेतील मानव आणि त्यांचे जीवन याची प्रचिती देणारा आहे. साप्ताहिकाच्या अंतरंगात डोकावताना आकर्षक रचना, वाचनीय लेख, सुस्पष्ट शब्द गुंफण आणि त्यात इंद्रधनू रंगांची उधळण करीत केलेली कलाकुसर मन प्रफुल्लीत करते. “लिहिते व्हा ” हे ब्रीद घेऊन आलेले साप्ताहिक सुरुवाती पासूनच वाचकांची उत्कंठा वाढवणारे प्रोत्साहित करणारे, प्रेरणादायी ठरणारे असल्याची खात्री पटते..

शिलेदारांचे गद्य लेखन असो वा पद्य, अथवा परीक्षकांचे परीक्षण सगळंच कसं आपण, सविता ताई आणि आपल्या संपादकीय मंडळाने ते राजहंसारखं टिपलं, म्हणूनच आज साहित्य गंध आणि वाचक यांचा स्नेहबंध हा कायमचा दृढ होत गेला. खरं चैतन्य निर्माण करणारे आपले संपादकीय मंडळ, प्रशासक, परीक्षक, मार्गदर्शक, सहसंपादक, यांचेकडून आणि अंकातील लेखक, कवी, कवयित्री यांच्या प्रेरणेतून अंक आज सुवर्ण महोत्सव साजरा करू शकला.
आपले भाषा सक्षमीकरणांचे उद्दिष्ट साध्य झालं.

सुवर्ण महोत्सवाच्या पूर्व संध्येला
रविकिरणांनी लावली हजेरी
आपल्या अंकाची ख्याती पसरली गगनावरी..आपला हा अंक चिरंतन चालू राहो ही सदिच्छा व्यक्त करते. आपणा सर्वांसाठी आभाराची शब्द सुमने अर्पण करते आणि शब्दप्रभूंना वंदन करून मी माझ्या लेखणीला स्वल्पविराम देते..!!

अनिता व्यवहारे
‘प्रवरेची फुले’ कविता संग्रह प्रकाशित
ता श्रीरामपूर जि अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles