“अहो, संडे इज ऑलवेज फंडेच की”

“अहो, संडे इज ऑलवेज फंडेच की”



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘रविवारी चिमणराव या साधारणतः आठवी की नववीत (नीटसे आठवत नाही) या पाठाची प्रत्यक्ष अनुभूती आली ती कालच. काय तो कालचा दिवस!तस् म्हटलं तर प्रत्यक्ष असा एकतरी दिवस देव करो आणि पुन्हा-पुन्हा अनुभवायास मिळो. ‘मोकाट जनावरासारखे’ सर्व टेन्शनस् खुंटीला टांगून एक दिवस स्वतः साठीच जगायचे, असं ठरवूनच घरातून बाहेर निघताना पहिलं पाऊल टाकले. तशी एकट्यानी फिरायला फारशी काही मज्जा येत नाही, पण कोणी सोबती असली की, फिरण्याची मज्जा काही औरच. म्हणून घरातून निघतांना लहान मुलीलाही सोबतीला घ्यायचं मनोमनी ठरवलं. नवऱ्याला आधीच रात्री खमकावून सांगितलं होतं की,उद्या माझी घरकामाला दांडी.आठवड्याचे सातही वार मी घरकामात मग्न असते. उद्या काही मी घरात काम करणार नाही. उद्या मी वाट मिळेल तिथे भटकणार आहे. माझा हट्टी स्वभाव तो पुरता जाणूनच. त्यामुळे नकारघंटेचा तर काही प्रश्नच नव्हता.

मग काय मुलीला घेऊन निघाली भटकंतीला. जातांना कपाटातून प्रवासासाठी पैसे घेतले. संध्याकाळपर्यंत तरी घरी तोंड फिरकावयाचे नव्हते. कारण सबंध दिवस रोजच घरी राहून राहून एकलकोंडेपणाचा (घरात एकटीने वावरत असल्याने) फारच वीट आला होता. घराला कुलूप लावले अन् रिक्षा पकडून बालपणापासून पसंतीस पडणारे आवडीचे ठिकाण कल्याण गाठले. खूप दिवस झाले होते जवळपास महिना दीड महिना लोटून गेला असेल कल्याण बाजाराचा फेर फटका मारून. आज बाजारात मनसोक्त फिरायचे ठरवले. मुलगी समोसा खाण्याचा हट्ट करायला लागली आणि समोरच वडापावचा खमंग असा वास सुटला होता. जोरदार पाऊस त्यात गरमागरम वडापाव म्हणजे ‘सोने पे सुहागा’. ताव न मारणार तो मुर्दाडच. दोघींनी मस्तपैकी नास्ता उरकला. तेवढ्यात मम्मीचा फोन आला तीही भरकटायला उत्सुक होतीच. मी तिला गाठले आणि मुलीला काकीजवळ ठेवून आम्ही माय-लेकी निघालो नेहमीप्रमाणे कल्याण भटकायला. लग्नाआधी नेहमीच मम्मीबरोबर आम्ही भावंडे मनसोक्त कल्याणला शॉपिंग करायचो.आज बऱ्याच दिवसांनी तिच्यासोबत फिरतांना ते आधीचे जुने दिवस पुन्हा नव्याने जगायला मिळाले.

जवळ-जवळ दोन-तीन तास कल्याण भरकटून आम्ही घरी परतलो. एक मस्त झोप काढून (माहेरी झोपा काढणे म्हणजे परमसुख) सासरी परतायला निघाले.(सासर माहेर जवळच एक तासावर) नेहमीसारखे रिक्षाने न जाता नदीवाटे नवीन रस्त्याने चालत जाण्याचे ठरविले.मग आईचा निरोप घेऊन मुलीसोबत सामानाची पिशवी घेऊन चालल-चालत घरी परतले. जंगल वाटेने येतानाही मुलीसोबत पावसाचा खूप दिवसांनी जो आनंद लुटला. खरंच असा रविवार पुन्हा आता परत लवकरच यावा असे वाटते. साचलेले डबक्यातले पाणी तुडवताना कॉलेजचे दिवस पुन्हा आठवले.सामानाची पिशवी नसती तर छत्री बंद करून भिजावे,असेच मनोमन वाटत होते.घरापासून थोडेच अंतर बाकी असताना मुलगी एका मोठ्याशा पाण्याच्या डबक्यात भिजायला गेली आणि मी गंमतीने तिला म्हणाली,”या पाण्यात पण कधी-कधी साप बसलेले असतात”.माझे वाक्य तिच्या कानावर पडते न् पडते ती पायातली चप्पल तशीच त्या पाण्यात टाकून त्या पाण्यातून तशीच अनवाणी बाहेर पळत आली.आणि मग काय ती चिखलात रुतलेली चप्पल त्या पाण्यात जाऊन मलाच शोधावी लागली. बराच वेळ चाचपडून अखेर चप्पल एकदाची सापडली.

पैशाने न मोजता येणारे,
असे काही आनंदाचे क्षण…
रिकाम्या ओळी भरून निघाव्या,
तसेच हे अनमोल सुखाचे कण…

राणी पाटील
‘मुकी शब्दफुले’ चारोळी संग्रह प्रकाशित
वडवली गाव,आंबिवली, मुंबई

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles