Home ताज्या घटना नोकरीसाठी कुणालाही पैसे देऊन आपली फसवणूक करून घेऊ नये; हेमंत गडकरी

नोकरीसाठी कुणालाही पैसे देऊन आपली फसवणूक करून घेऊ नये; हेमंत गडकरी

236

नोकरीसाठी कुणालाही पैसे देऊन आपली फसवणूक करून घेऊ नये; हेमंत गडकरीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा – मनसे हिंगणा विधानसभा क्षेत्रा तर्फे आयोजित भव्य उद्योजगता २०२२ मेळाव्यात आलेल्या रोजगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे व शासनाच्या योजनांची माहिती दिली त्याचा सभागृहातील काहींना जरी स्वयंसिद्ध होण्यासाठी लाभ झाला तरी आम्हा मनसे पदाधिकाऱ्यांना मनापासून आनंद होईल व मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या सामाजिक सेवेचा संस्कार कृतीत उतरल्याचे मानसिक समाधान लाभेल असे प्रतिपादन मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले.

नवउद्दोजक जेव्हा उद्योग उभारणीसाठी बँकेचे सहकार्य मागतो तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी झारीतील शुक्राचार्य ही भूमिका घेऊ नये तसेच बेरोजगार व्यक्ती ने प्रसंगी मिळेल त्या कामाचा स्वीकार करावा पण नौकरी साठी कुणालाही पैसे देऊन आपली फसवणूक करून घेऊ नये असेही हेमंत गडकरी यांनी या प्रसंगी सांगितले.