वावोशी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दर्शना हातनोलकर यांची बिनविरोध निवड

वावोशी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दर्शना हातनोलकर यांची बिनविरोध निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अलिबाग( सचिन पाटील )

रायगड: खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वावोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दर्शना दिनकर हातनोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वावोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुनीता भालेराव यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणूक कार्यक्रमाला ३ सदस्य अनुपस्थित असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. परंतू ४ सदस्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच प्रभाकर छत्तीसकर यांनी काम पाहिले.

या वेळी माजी सरपंच वालचंद ओसवाल यांनी पुढच्या वेळी देखील वावोशी ग्रामपंचायतमध्ये शिवसेना भाजप युतीचीच सत्ता येणार असल्याचे सांगून नवनिर्वाचित उपसरपंच दर्शना हातनोलकर या उर्वरित कार्यकाळात चांगली कामगिरी करतील असे सांगून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित उपसरपंच दर्शना हातनोलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राम वाघमारे, माजी उपसरपंच महेश कडू, माजी ग्रामपंचायत सदस्या रंजना कडू, ग्रामसेवक प्रल्हाद शिंदे, ग्रामसेविका मालती पाडगे, सामाजिक कार्यकर्ते जयंत टिळक, वसंत वालम, तानाजी शिंदे, दिनकर हातनोलकर, मुरलीधर कडू, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles