व्यसन हे स्लो पॉइझनिंग; अनिल पारखी

व्यसन हे स्लो पॉइझनिंग; अनिल पारखी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: युवक हा उद्याच्या देशाचा आधारस्तंभ आहे. पण ह्या आधारस्तंभालाच राजकारनी मतांच्या राजकारणासाठी अंधश्रध्देला खतपानी व व्यसन वाढीस हातभार लावतांना दिसतात तेंव्हा मन विषण्ण होते! खेद होतो. युवा वर्गाला हाताशी धरुन राजकारनी युवकांना अंमली पदार्थ देऊन युवकांची मंदिर मस्जिद मध्ये विभागनी करण्याचे महापाप करतात व युवकांना व्यसन रुपी नरकाच्या खाईत ढकलतात!

पर्यायाने शहरात व गावातही अवैध धंद्याना ऊत आला आहे व्यसनाधिनता वाढत आहे. व याला सर्वस्वी शासन व अधिकारी जबाबदार आहे. यांना कमीशन दिल्या जाते व म्हणूनच कुत्र्यांच्या छत्र्याप्रमाणे छात्रछायाखाली अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत आहे. तरी अधिकारी व राजकारनी कानडोळा करत आहे. ही गंभीर बाब आहे! लाजीरवाणी बाब आहे!

व्यसनाधिनतेने अनेकांची घरे उध्वस्त होत असतांना कां बरे बघण्याची भूमिका घेत आहेत? व्यसन हा आजार आहे यावर औषधही उपलब्ध नाही हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट असतांनाही दुर्लक्ष कां? जाणूनबजून स्लो पॉइझनिंग करण्याचा प्रकार समजावा काय?

बरे, समाजसेवी संघटना वा समाजसेवकही गंभीर दिसत नाही. युवकांना वैज्ञानिक दृष्टिकोणाची जाणीव करुन देण्याचे व*व्यसनाधिनतेपासून परावृत्त करण्याचे काम समाज सेवक करु शकतात समाजभान जपणारे समाजसेवक आजही आहेत! अंमली पदार्थ तथा मादक द्रव्यापासून युवकांना परावृत्त करण्याचा वसा घेण्याची गरज आहे. करोडो रुपयाचा अमली पदार्थ सापडतात काही नावापुरता दाखवितात हा धंदा जोमात चालू आहे लाखो युवकांचे करियर बर्बाद होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles