स्कूल ऑफ स्कॉलर्स‌‌‌ बेलतरोडी येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

स्कूल ऑफ स्कॉलर्स‌‌‌ बेलतरोडी येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यशपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, प्रतिनिधी नागपूर

नागपूर:- सी.बी.एस.ई. बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. यात स्कूल ऑफ स्कॉलर्स‌‌‌ बेलतरोडी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. शाळेतील १२१ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. शाळेच्या निकाल १०० टक्के लागला. शाळेतील ओम उमेकरने ९७.०४ % घेऊन प्रथम क्रमांक, तर साहिल वर्गणेने ९७.०० % घेऊन व्दितीय, श्रेयसी खोब्रागडेने ९६.०४ % घेऊन तृतीय क्रमांक तर कार्तीक राणेकरने ९६.०२ % घेऊन चौथा क्रमांक पटकावला. सी.बी.एस.ई. दहावीचा निकाल लागल्यावर स्कूल ऑफ स्कॉलर्स‌‌‌ शाळेत उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षीका व प्राचार्यांना दिले. स्कूल ऑफ स्कॉलर्स‌‌‌ बेलतरोडी नागपूरच्या प्राचार्या केतकी शेंद्रे यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनभरून कौतुक केले, व भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles