सीबीएसई दहावीत आर्यन उकुड्डे प्रथम
गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी
हिंगणा- नेहरु विद्यालय, हिंगणा येथील सहाय्यक शिक्षक यादवराव उकुड्डे व जिल्हापरिषद शाळा, आमगांव-देवळी येथील शिक्षिका शिल्पा उकुड्डे यांचा मुलगा आर्यन उकुड्डे याला केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण प्राप्त करुन तो माँ उमिया शाखेच्या सोमलवार शाळेत प्रथम आलेला आहे.त्याबद्दल आर्यनचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला सामाजिक शास्त्र ,संस्कृत व गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहे.
आर्यनला डॉक्टर होऊन गरीब जनतेची सेवा करायची आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री दत्ता मॅडम, वर्ग शिक्षिका पद्मावती मॅडम, गणित विषयाच्या मंगला मॅडम, विज्ञान विषयाच्या सुषमा मॅडम, सामाजिक शास्त्र विषयाच्या निधी मॅडम व संस्कृत विषयाच्या वंदना मॅडम यांनी आर्यन ला परीक्षेत मिळालेल्या यशाचे कौतुक केले.