मंत्री म्हणजे चोर, डिक्शनरीत नोंद व्हावी.- शिवराम पाटील

मंत्री म्हणजे चोर, डिक्शनरीत नोंद व्हावी.- शिवराम पाटील



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर – राजा , प्रधान,सेनापती यांचे व्यतिरिक्त राजाला,प्रधानाला, सेनापतीला राज्यकारभार विषयक सल्ला देण्यासाठी काही बुद्धीमान, प्रामाणिक, निस्पृह लोकांची नेमणूक केली जात होती.राजा भोज , सम्राट अकबर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंत्री इतिहास प्रसिद्ध आहेत.ते राजाला योग्य सल्ला देत असत.जे राजाला कामकाजात सुचत नव्हते.राजा मोठ्या मनाने ते स्विकारत असत.

आता लोकशाहीत केंद्र सरकार व राज्य सरकार मधे असेच मंत्री असतात.ते सुद्धा बुद्धीमान, प्रामाणिक, निस्पृह असावेत.पण आताचे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री जाणिवपूर्वक निर्बुद्ध, भ्रष्ट, गुन्हेगार आणि लंपट लोकांना मंत्री नेमतात.ते निर्बुद्ध,भ्रष्ट, गुन्हेगार,लंपट असल्याचे माहिती असूनही.नसेल माहिती तर आम्ही सांगूनही त्यांनाच घेतले जाते.म्हणजे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री हे जाणतेपणी चुकीची माणसे मंत्रीपदावर नेमून चुकीचे काम करतात.तसाच त्यांचा हेतू असतो.हे जनतेने ओळखले पाहिजे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी देशमुख,मलिक,परब ,राठोड यांना मंत्री नेमून चुकीचे काम केले.तेच काम आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना करीत असल्याचे आम्ही ओळखले.म्हणून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले कि, भ्रष्ट माणसाला मंत्रीपद देऊ नका.आम्ही जळगाव जिल्ह्यातील नागरिक आहोत.आमच्या हितासाठीच आमचा मंत्री नेमला पाहिजे.जर तो भ्रष्ट असेल तर त्याला मंत्री नेमू नये.तरीही एकनाथ शिंदे तसेच करीत असतील तर त्यांचा हेतू चुकीचा ठरतो.जनहिताचा ठरत नाही.सत्ता मिळाली तर सद्सदविवेक बुद्धी संपते.पण आठवण करून दिली तर जागृत होते.तरीही भानावर आले नाही तर समजावे,हाच तर मुख्य हेतू आहे.

महाराष्ट्र , बंगाल मधील मंत्र्यांवर इडीची कारवाई केली.मोठे घबाड सापडले.म्हणून जनतेला माहिती पडले.पण यांना ज्यांनी मंत्री बनवले ,त्यांना हे नक्कीच माहीत असावे.त्याशिवाय इतरांना डावलून यांना मंत्रीपद दिले का?जसे इतर चांगले आमदारांना डावलून एकनाथ शिंदे गुलाबराव पाटलांना मंत्रीपद देऊ इच्छित आहेत.का? अशीच माणसे मुख्यमंत्रीला उत्पन्न मिळवून देत असतात.राज्याचा मुख्यमंत्री बनणे म्हणजे राज्याचा कारभार करणे,जनहिताची कामे करणे नसून आपले घबाड भरणे हाच उद्देश सिद्ध करीत आहेत.त्यासाठी चोरीत निपुण,कुशल,अव्वल असलेल्यांनाच मंत्री बनवण्याचा अट्टाहास करीत आहेत.म्हणजे मंत्री म्हणजेच चोर हे दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीला मान्य आहे,पसंत आहे.राज्याचे राज्यपाल यांना मंत्रीपदाची शपथ देतील.म्हणजे त्यांनाही मान्य आहे कि मंत्री म्हणजेच चोर.माध्यमे सुद्धा याचा प्रचार, प्रसार करतील.म्हणजेच त्यांनाही मान्य आहे कि मंत्री म्हणजे चोर.तर मग,आम जनतेने का मान्य करू नये ? पोलिस व कोर्टाने का मान्य करू नये?भाषेच्या शब्दकोषात तसा उल्लेख का करू नये ?शब्दाच्या पुढे अर्थ लिहीला गेला पाहिजे,मंत्री म्हणजे चोर.त्यामुळे शाळकरी शिक्षणात सुद्धा याचा उल्लेख केला पाहिजे, मंत्री म्हणजेच चोर.परीक्षेत समानार्थी शब्द विचारला असता,मंत्री म्हणजेच चोर,हे उत्तर शिक्षकांनी बरोबर समजले पाहिजे.

असे झाले आणि मला तशी संधी मिळाली तर मी शपथ घेईन,
” मी शिवराम मगर पाटील ,शपथ घेतो कि,सरकारची तिजोरी लुटण्यासाठी मला चोरपदावर नियुक्ती देऊन चोरीची जबाबदारी सोपवलेली आहे.जाणतेपणी किंवा अजाणतेपणी मी कुठे व किती चोरी केली हे गोपनिय ठेवीन.मी केलेल्या चोरीतून माननिय मुख्यमंत्री यांना रीतसर त्यांचा हिस्सावाटा देईन.मला निवडून दिलेल्या जनतेशी बेईमानी करीन पण मला चोरपदावर नियुक्ती करणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांशी बेईमानी करणार नाही.” अशि प्रतिक्रिया प्रसिद्धी करीता शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव.यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles