संध्या बन्सोड प्रकरण – आत्महत्या नसून खून; भावाचा आरोप.

संध्या बन्सोड प्रकरण – आत्महत्या नसून खून; भावाचा आरोप.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आरोपीला अजून अटक नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद_

नागपूर : पतीकडून सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित महिलेने दि. १५ जुलै रोजी घरिच आत्महत्या केली होती या प्रकरणात तिच्या सख्या भावाच्या तक्रारींवरून पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु पोलिसांनी आरोपीला अजूनही अटक केली नाही. त्यामुळे मृतकाच्या भावाने पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांना तकार करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.

गल्ली नंबर 2 चंद्रमणी नगर नागपूर येथील रहिवासी देवेंद्र दिगंबर बनसोड यांच्याशी संध्या ल.खरतडे रा.जांब रोड वडगांव यवतमाळ येथील दि. १९ जून २०२० रोजी बौद्ध पद्धतीने विवाह संपन्न झाला होता. देवेंद्राचे वय -43 याच्याशी लग्न झाले होते.

लग्नानंतर देवेंद्र हा कुठलीही काम करत नव्हता व सातत्याने संध्याला माहेरून पैसे आणण्यासाठी छळत होता. संध्याचा भाऊ राहुल खरतडे यांच्या यवतमाळ येथील घरी जाऊन अनेकदा पैसे मागितले होते व भावाने देखील तिची मदत केली होती. मात्र राहुलच्या आईवडिलांचे निधन झाल्याने सर्व जबाबदारी राहुलवर संपुर्ण जबाबदारी आल्यामुळे संध्याची आर्थिक मदत करू शकले नाहीत.

यावरून देवेंद्र कडून संध्याला त्रास देण्याचे प्रमाण वाढले होते. तिने तिच्या बहिणीला याबाबत माहिती दिली होती. परंतु खुपच छळ झाल्याने अखेर तिने घरीच आत्महत्या केली. मृत्यूच्या दोन दिवस अगोदर बहिणीशी बोलत असताना नवऱ्याचा शारीरिक व मानसिक त्रास वाढल्याचे तिने सांगितले होते. याबाबत राहुलने देवेंद्रला जाब विचारला असता, तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला अखेर त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली व पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली आहे.

परंतु आरोपीला अध्यापही अटक केली नाही अटकपूर्व जामीनही न्यायालयाने फेटाळला आहे. देवेंद्र बनसोड ला अद्यापही अटक केली नाही हे प्रकरण जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनामार्फत दाबत आहे असा आरोप राहुल खरतडे यांनी लावलेला आहे. संध्या बनसोड हीची आत्महत्या नसून खून केल्याचा आरोप. न्यायपासून मी वंचित आहे. माझ्या बहिणीला न्याय देण्यात यावा अशी मागणी तिच्या सख्या भावाने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles