
वैभव नाईक यांचा वाढदिवस बारामतीच्या ‘निवासी मूकबधीर’ विद्यालयात साजरा
वसुधा नाईक
पुणे: बारामती कर्हावागज येथील ‘निवासी मूकबधीर विद्यालय’ या शाळेला वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली. गेली तेरा वर्ष हे कार्य चालू आहे. या संस्थेच्या मुध्याध्यापिका, संस्थापिका रामेश्वरी जाधव व कुटुंबीय यांचे खूप कौतुक वाटले. तसेच त्यांच्या बरोबर या कार्यात उत्तम साथ देणार्या अश्विनी भोसले यांचेही खूप कौतुक वाटले .
मूकबधीर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उत्तम शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. या शाळेत एकूण ३५ विद्यार्थी आहेत .यांच्या शिक्षणाबद्दल माहिती करून घेतली . संस्थेचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे. मुले खूप गुणी आहेत.
या शाळेला शैक्षणिक साहित्याची मदत केली. मुलांना खाऊ वाटप केले. या कार्यक्रमासाठी खालील मान्यवरांची उपस्थिती होती.
मंगेश खताळ- रा. बहुउद्देशीय संस्था भारत ..बारामती तालुका अध्यक्ष
संजय अहिवळे -बारामती तालुका कार्याध्यक्ष, अनिल तांबे – संपादक बारामती झटका वर्तमानपत्र