क्रांती दिन व आदिवासी दिनानिमित्त न्यू मून शाळेत हुतात्म्यांना आदरांजली

क्रांती दिन व आदिवासी दिनानिमित्त न्यू मून शाळेत हुतात्म्यांना आदरांजली



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तारका रूखमोडे

अर्जुनी/ मोरगाव: अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे औचित्य साधून अर्जुनी मोरगाव येथील न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे क्रांतीदिनानिमित्त हुतात्मा स्मारक अर्जुनी /मोर. येथे आज दि ९/०८/२०२२ रोजी नगरपंचायत पदाधिकारी, पोलीस निरीक्षक व संस्थाध्यक्ष, संस्था सचिव यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना सुमन चक्र अर्पून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, त्या क्रांतीचं बीज मनामनात पेरणाऱ्या अमर हुतात्म्यांची आठवण सदैव मनात तेवत राहावी; तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव राहावी यासाठी शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. एक मिनिटाचे मौन पाळून शहिदांना व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. न्यू मून स्कूल ते हुतात्मा स्मारकापर्यंत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर पावसात रॅलीत सहभागी होऊन क्रांतिकारकांप्रती असलेल्या आदरनिष्ठेची प्रचिती दिली. या निमित्ताने संस्थाध्यक्ष यशवंत परशुरामकर, सचिव ओमप्रकाशसिंह पवार, प्राचार्य सचिन मेश्राम, प्राध्यापिका सौ.तारका रुखमोडे, प्राध्यापक राकेश उंदीरवाडे यांनी विद्यार्थ्यांना भाषणातून मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व शिक्षिका लीना चचाणे, त्रिवेणी थेर, कुंजना बडवाईक, हिना लांजेवार, प्रतिक्षा राऊत,श्री बांडे, शालेय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles