नागपूरकरांनी सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा

नागपूरकरांनी सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मागील 15 वर्षापासून नागपूरकरांनी देशाच्या सिमेवर रक्षण करणा-या सैनिक बांधवासाठी स्वतः राख्या बनवून सैनिकांना राख्या पाठवून दिर्घाआयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी नागपूरकांचे संयोजक निखिल भूते यांच्या पुढाकाराने नागपुरातील सामाजिक आध्यामिक महाविद्यालयीन सांस्कृतिक क्रिडा व सैनिकी संघटनाच्या संकल्पनेतून भारत-पाकिस्तान कारगीर (बार्डर) वरील सैनिकांनसाठी नागपूरकराच्या वतीने नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या हस्ते व प्राचार्य विक्रांत चिलाटे, हरिश गणेशानी यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध मान्यवरांच्या हस्ते नागपूर जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला यांच्या माध्यमातून बॉर्डर वर राख्या पाठविण्यात आल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागपूर श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले, मुख्य संयोजक निखील भूते तायवाडे विशेष अतिथी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विक्रांत चिलाटे, विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक हरिश गणेशानी, मिसेस युनिवर्स सौ. प्रविणा दाढे, कमलेश माचेवार, अभिजीत दरवडे, नरेश निमजे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाला संबोधित केले.

यावेळी नागपूरकारांच्या वतीने मिसेस युनिवर्स सौ.प्रविणा दाढे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती आर . विमला यांना राखी बांधून दिर्घाआयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन निखिल भूते, प्रास्ताविक विक्रांत चिलाटे, आभार प्रदर्शन अभितीज दरवडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी आकांक्षा सडमाके, अश्विनी सिडाम, आचल मेश्राम, ऋषभ काहाने, दिशांत पटले, स्वास्तिक अंजनकर, खुशी हेडाऊ, करिना मेहर, श्रेया झोड, मानशी बोकडे, शिवानी ढोके, सोनु शरणागत, प्रज्वल बोरीका, आदित्य चाफरे, होषल हिरवानी व इतरांनी अथक परिश्रम केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles