‘पीपल टू पीपल’ सोसायटी च्यावतीने तृतीय पंथीयांच्या शिबिराचे चिखलदरा येथे समापन

‘पीपल टू पीपल’ सोसायटी च्यावतीने तृतीय पंथीयांच्या शिबिराचे चिखलदरा येथे समापन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: येथील “पीपल टू पीपल” सोसायटीच्या वतीने तृतीय पंथीयांकरिता आयोजित ध्यान व नीतिमूल्य शिबिराचे समापन झाले. हे शिबिर चिखलदरा येथील बिहाली स्थित अचलभूमी ध्यान साधना व प्रशिक्षण शिबिर केंद्र येथे 5 ते 8 ऑगस्ट या कालावधीकरिता आयोजित करण्यात आले होते. ज्यात एकूण 31 शिबिरार्थि सहभागी झाले. शिबिराचे नेतृत्व धम्मचारी अमोघ सिद्धी यांनी केले तसेच त्यांना सहकारी भूमिकेत धम्मचारी रत्नसिद्धी व धम्मचारी अनोमशुर यांनी मदत केली.

शिबिरांमध्ये जागृती व एकाग्रता विकसित करण्याकरिता अनापानसती या ध्यानाच्या सरावाची संपूर्ण माहिती देऊन सराव घेण्यात आला तसेच आपले मन अधिक व्यापक करण्याचे दृष्टीने वैश्विक मैत्री विकसित करण्यासाठी, चित्त सकारात्मक व कुशल करण्यासाठी मैत्री भावनेचा सराव धमचारी रत्न सिद्धी यांचे द्वारा घेण्यात आला. याप्रसंगी चलित ध्यान नामे चंक्रमण याचा देखील सराव करण्यात आला.

उपस्थित तृतीयपंथीयांनी या सरावांमध्ये उत्तम प्रतिसाद देऊन स्वतःला प्रशिक्षित करण्यात नेहमीच तत्पर ठेवले. विविध गटांतील वैमनस्य दूर व्हावे, एकदुसऱ्याबाबत सामंजस्य वाढावे म्हणून मानवी सकारात्मक संपर्क कसा विकसित केला जाऊ शकतो याचे मार्गदर्शन धम्मचारी अनोमशुर यांनी केले व काही संवाद कौशल्याचे प्रात्यक्षिकेही घेण्यात आली.

शिबिरांत धम्मचारी अमोघ सिद्धी यांनी माझ्या जीवनाचे अधिष्ठान या विषयानुशंगाने उत्तम मार्गदर्शन व प्रवचन केले. प्रवचनानंतर विविध गटांमध्ये विषयाची स्पष्टता, गांभीर्य व सखोलता याबद्दल चर्चा करण्यात येत होती. शिबिरांमध्ये उपस्थित तृतीयपंथीयांनी समापन पूर्वसंध्येला आपापल्या कलेचे सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण केले ज्यामध्ये नृत्य व मॉडेलिंगचे नमुने सादर करण्यात आले. शिबिराच्या उत्तम व्यवस्थेकरिता धम्मचारी सूचीकीर्ती, आर्यसिद्धी यांनी मदत केली तर सुषमा नागरे कांबळे,अश्वघोष राऊळ, विवेकचित्त इत्यादींनीदेखील स्थानिक पातळीवर सहकार्य केले.

संस्थेच्या अध्यक्षा अनुश्री खोब्रागडे यांनी सर्व उपस्थित तृतीयपंथी गट नेतृत्वकर्ता, LGBTQ समाजाकरिता कार्यरत शिबिरार्थिचे व सर्वांचेच आभार प्रदर्शन केले तर तृतीयपंथी गटाकडूनही संस्थेने चालविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

या शिबिराच्या संपूर्ण यशस्वती करिता धम्मचारी तेजधम्म आणि तसेच बिहाली येथील शिबीर केंद्राचे व्यवस्थापक धम्मचारी मनायू यांनी उत्तम कार्य केले. शेवटी सामूहिक विश्व मैत्री गीताने शिबिराचा समारोप करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles