आठव्यांदा घेतली नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

आठव्यांदा घेतली नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पाटणा: बिहारमध्ये झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच नितीश कुमार यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

2014 मध्ये येणारे 2024 मध्ये राहणार का? आम्ही असो किंवा नसो, ते 2024 मध्ये राहणार नाहीत असं म्हणत नितीश कुमारांनी भाजपला खूलं आव्हान दिलं आहे. भाजपसोबतची युती तोडण्याबाबतही नितीशकुमार उघडपणे बोलले. ते म्हणाले, गेल्या दीड महिन्यांपासून आमच्यात कोणत्याही प्रकारचा संवाद नव्हता. जे घडत होतं ते चुकीचं होतं. भाजपसोबत गेल्यानं आमचं नुकसान झालं असंही ते म्हणाले आहेत.

नितीश कुमार म्हणाले की, आमच्या पक्षाचे सर्व लोक भाजप सोडा, असं सांगत होते. त्यामुळे अखेर आम्ही हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानपदाच्या दाव्याबाबत ते म्हणाले की, हे सर्व सोडा. काही लोकांना विरोध संपेल असं वाटतंय. मात्र आता आम्हीही विरोधात आलोय. संपूर्ण विरोधकांनी एकजुटीनं पुढे यावं आणि योजना तयार करावी अशी आमची इच्छा आहे. 2014 मध्ये या लोकांना बहुमत मिळालं होतं, पण आता 2024 येत आहे असं म्हणत नितीश कुमार यांनी आपली आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles