
बुलडाणा नव्हे आता बुलढाणा लिहावं लागणार….!
_जिल्हा प्रशासनाने केला बदल_
बुलढाणा : एकेकाळी थंड हवेचं ठिकाण असलेल्या व इंग्रजांच्या काळात जिल्हा मुख्यालय झालेल्या ” भिल्लठाणाचे ” कालांतराने अपभ्रंश होऊन बुलडाणा झालं. मात्र बुलडाणा की बुलढाणा अशी चर्चा नेहमीच रंगायची.. ती नेहमी प्रमाणे अजूनही सुरूच होती.. प्रशासनाकडेही त्यावर उत्तर नव्हत.. त्यामुळे शासकीय कामकाजात कुणी बुलडाणा लिहीत असे तर कुणी बुलढाणा .. मात्र आता यापुढे ‘ बुलढाणा ‘ असच नामकरण योग्य आहे.. व तसा गॅझेट मध्येही उल्लेख असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सर्व कार्यालयाला दिली आहे.
त्यामुळे आता यापुढे सर्वच कार्यालयीन कामकाजात बुलडाणा ऐवजी बुलढाणा अस लिहिण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. तसा बदल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील फलकावर सुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे सर्वांना बुलडाणा ऐवजी बुलढाणा असा उल्लेख करावा लागणार आहे.