फुटपाथवरील लक्ष्मीच्या खंडित मूर्त्या युथ फाऊंडेशनने केल्या संकलीत

फुटपाथवरील लक्ष्मीच्या खंडित मूर्त्या युथ फाऊंडेशनने केल्या संकलीत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक_

नागपूर: उपराजधानीतील दक्षिण नागपूर परिसरातील रमणा मारुती युथ फाउंडेशनच्या वतीने शहरात प्रथमच एक स्तुत्य व नवीन उपक्रम राबविण्यात आलेला आहे. त्या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पहायला मिळत आहे.

दिवाळीमध्ये ज्या माता लक्ष्मीची आपण मोठ्या आनंद व उत्साहाने पूजाअर्चा करून आगमन करतो व माता लक्ष्मीची कृपा नेहमी आपल्या घरावर राहो असा आशीर्वाद मागतो; त्याच माता लक्ष्मीच्या मूर्ती पीओपी पासून बनलेल्या असल्या कारणाने आज त्याची अवहेलना होऊन फुटपाथवर रस्त्याने खंडित होऊन पडलेल्या दिसत आहे.

फुटपाथवरील याच खंडित मूर्त्या संकलन करण्याचे कार्य रमणा मारुती युथ फाउंडेशन ने आपल्या हाती घेतलेले आहे. या सर्व एकत्रित केलेल्या पीओपीच्या मूर्त्या एका टाकीमध्ये पाण्यासोबत अमोनियम बायकार्बोनेट मिक्स केले की ४८ तासामध्ये विरघळतात आणि यातून बेस्ट फ्रॉम वेस्ट या संकल्पनेतून विरघळलेले मिश्रण पुढे खडू निर्मिती साठी कामात येऊ शकते.

यंदा स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रमणा मारुती युथ फाउंडेशन ने परिसरातील खंडित लक्ष्मीच्या मूर्त्या जमा केल्या व यांच्या या संपूर्ण कार्याला नागरिकांचे देखील भरघोस सहकार्य मिळाले आणि या सुंदर उपक्रमाची प्रत्येक नागरिकांनी प्रशंसा केली व फाउंडेशनच्या वतीने हे कार्य निरंतर असेच चालू राहील असे सांगण्यात आले.

या संपूर्ण उपक्रमाध्ये रमणा मारुती युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण उरकुंडे, उपाध्यक्ष क्षितिज इंगळे, उपसचिव अक्षय ईखारकर, कोषाध्यक्ष लोकेश झुनके,आशिष उरकुंडे, नगरातील दीपक कारेमोरे,प्रशांत मोहोड,शंकररावजी पिरकुंडे, खवास साहेब व इतर नागरिकांनी यामध्ये सहयोग केला केला. तसेच फाउंडेशन च्या वतीने नागरिकांच्या निदर्शनात अशा प्रकारच्या खंडित मूर्त्या आढळल्यास त्यांनी रमणा मारुती युथ फाऊंडेशनच्या सदस्यांशी संपर्क करावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles