चारचाकी गाडीसह 5 लाख 80 हजार 200 रुपयांचा विदेशी दारुसाठा जप्त

चारचाकी गाडीसह 5 लाख 80 हजार 200 रुपयांचा विदेशी दारुसाठा जप्त



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई._

वर्धा – स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत चारचाकी गाडीसह सुमारे 5 लाख 80 हजार 200 रुपयांचा विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मौजा दत्तपुर शिवार, वर्धा बाय पास रोड इथे करण्यात आली असून 3 आरोपींपैकी 1 आरोपी फरार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्र MH-31 EA 4483 नागपूर जिल्ह्यातील सावंगी (आसोला) येथे असणाऱ्या लिओ पोल्ड-9 नावाच्या बारमधून देशी, विदेशी तसेच बियर दारूचा साठा घेऊन स्विफ्ट गाडी वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आली.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या रेडमध्ये 1 लाख 77 हजार 200 रुपयांचा दारूसाठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली गाडी, व एक मोबाईल असा सुमारे 5 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सदर मुद्देमाल हा सेवाग्राम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. सदर कारवाई वर्धा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles