
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना धोक्याची घंटा
पुणे: सिंचन घोटाळ्यातअजित पवारांना अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर कारवाईची शक्यता असल्याचे स्पष्ट झालं आहे. २०१९ मध्ये एसीबीने दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
अजित पवारांच्या क्लिन चीटबाबतचा अहवाल मागील दोन वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात तसाच पडून असल्याचे वृत्त एका चॅनल ने दिले आहे. यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात. २०१९ मध्ये अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात एसीबीने क्लीन चिट दिली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. याबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. मात्र मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोना संक्रमनामुळे न्यायालयाने हा अहवाल अद्याप स्वीकारला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.