हरिहरेश्वरमध्ये अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ

हरिहरेश्वरमध्ये अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_दहशतवादाचा संबंध नसल्याचीही माहिती_

रायगड: जिल्हयातील हरिहरेश्वर येथील समुद्रात एक अज्ञात तसेच संशयास्पद बोट आणि त्यात तीन एके ४७ रायफली आणि जिवंत काडतुसे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही बोट ओमानच्या नेपच्युन मेरिटाइम सिक्युरिटीजची असल्याचे प्रथमदर्शनी समोर येते आहे. त्यांची बोट भरकटल्याची माहिती या कंपनीकडून देण्यात आली होती. त्यामुळे तूर्तास यात दहशतवादाचा संबंध नसल्याचे म्हटले जात आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच विधिमंडळात नेमकी माहिती स्पष्ट करणार आहेत.

ओमानच्या समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर ही बोट भरकटली होती, असे समोर येते आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी विभागाच्या (एटीएस) माध्यमातून पुढील तपास सुरू असून सदर कंपनी एटीएसच्या संपर्कात आहे, असेही वृत्त आहे. रायगडमधील या प्रकारानंतर एटीएसचे पथक तिथे दाखल होणार आहे. मात्र यात दहशतवादाचा संबंध नाही, असेही म्हटले जात आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा २६/११च्या घटनेची आठवण ताजी झाली आहे. मुंबईत बधवार पार्क येथून पाकिस्तानातील १० अतिरेकी मुंबईत आले होते आणि त्यांनी जवळपास ६० तास मुंबईला वेठीस धरले होते. मुंबई सीएसटी रेल्वेस्टेशनवर अनेकांचे प्राण या अतिरेक्यांनी घेतले होते तसेच ताज हॉटेल, छाबड हाऊस येथेही त्यांनी हल्ले करत निष्पाप नागरिकांना मारले होते. त्यानंतर या हल्ल्यात सहभागी असलेला अजमल कसाब पोलिसांच्या तावडीत सापडला होता. त्याची नंतर चौकशी केल्यावर तो पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून पाकिस्तानचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे निश्चित झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles