ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूलमध्ये जन्माष्टमी साजरी

ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूलमध्ये जन्माष्टमी साजरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- अमरनगर वानाडोंगरी स्थित ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल येथे राधा कृष्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये मुलांना राधा व कृष्णाच्या वेशभूषेत यायचे होते.तसेच चॉकलेट हंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुलांना लाकडी डंड्याने चॉकलेटच्या हंडीला फोडायचे होते. यामध्ये चिमुकल्या मुलांनी उत्स्फूर्तपणे राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेत सहभाग घेतला.

तसेच कृष्णाच्या वेशभूषेत असलेल्या चिमुकल्या मुलांनी उंच उडी मारून लाकडी डंड्याणी चॉकलेट हंडीला फोडायचे प्रयत्न केले व या चॉकलेछट हंडी चे विजेते निल सोनटक्के चॉकलेटची हंडी फोडून मानकरी ठरले. तसेच राधा व कृष्ण कॉम्पिटिशन मध्ये नर्सरी मधून प्रथम क्रमांक वंश खोब्रागडे, मिस्टी येळे. द्वितीय क्रमांक सुरज बिंद, माही राठोड, तर तृतीय क्रमांक शिवांश पटले, धानी आडे यांनी पटकावला. के.जी. वन मध्ये प्रथम क्रमांक दर्शन यादव, त्रिशिका लोवंशी. द्वितीय क्रमांक देवांश सूर्यवंशी, मिस्टी मिसार तर तृतीय क्रमांक अथर्व जंघेला, पूर्वी महारवाडे यांनी पटकावला तर प्रोत्साहन पर पुण्याई ठोंबरे इला देण्यात आले.

के.जी. टू या वर्गातून प्रथम क्रमांक ग्रंथिक विजयवार, सृष्टी अडमे, द्वितीय क्रमांक प्रियांशू धुवारे, स्वरा मरठे, तर तृतीय क्रमांक नील सोनटक्के, तानिया कावळे यांनी पटकावला तर प्रोत्साहन पर म्हणून आरुष मेश्राम व असिमा महातो यांना देण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विनायकरावजी इंगळे गुरुजी उपस्थित होते. व प्रमुख अतिथी संजय गांधी निराधार योजनेच्या माजी सदस्या ललिताताई झलके व शाळेचे संचालक कमलेश खोब्रागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विनायकजी इंगळे यांनी मुलांना व पालकांना एका बोधकथेतून मार्गदर्शन केले.

त्यांनी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मुलांवर आईने कसे संस्कार पाडावे याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन करत पालकांचे मन स्वतःकडे वेधून घेतले व उपस्थित सर्व मान्यवरांनी स्पर्धकांचे निरीक्षण करत त्यांचे क्रमांक व विजेत्यांची नावे घोषित केले यावेळी अश्विनी माटे,वर्षा खोब्रागडे, हिना रिहल, प्रतीक्षा राऊत, आरती चौरे, नेहा बोपचे, अनिता टेंबरे व शाळेचे विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व उपस्थितांचे आभार कमलेश खोब्रागडे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles