महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर

महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_खा.सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण_

पुणे: राष्ट्रीय विचारांच्या प्रसार-प्रचाराचे कार्य करणारे विश्व संवाद केंद्र आणि शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत संस्था, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यां दोन्ही संस्थांच्या वतीने संयुक्तपणे दरवर्षी ‘देवर्षी नारद’ यांच्या नावाने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येते.

यावर्षीचे ‘नारद पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले असून पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी, सकाळी ११ वाजता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये एका विशेष समारंभात आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली असून ‘ज्येष्ठ पत्रकार’ या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, आणि ’टाईम्स ऑफ इंडिया’ पुण्याचे उप निवासी संपादक अभिजित अत्रे तसेच नाशिक येथील दैनिक ’देशदूत ’च्या संपादक वैशाली बालाजीवाले यांची नावे जाहीर झाली आहेत.

आश्वासक पत्रकार पुरस्कारासाठी दै. ’केसरी’च्या कोल्हापूर ब्यूरो चीफ अश्विनी टेंबे, ’महाराष्ट्र टाईम्स’ पिंपरी-चिंचवडचे विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे आणि ’सकाळ’ पुणे, कार्यकारी संपादक शीतल पवार यांची निवड झाली आहे.
व्हिडियो जर्नलिस्ट या पुरस्कारासाठी सांगलीचे आदित्य वेल्हाळ आणि पुण्यातील ’टाईम्स नाऊ वाहिनी’चे व्हिडियो जर्नलिस्ट रूख्मांगद पोतदार यांची निवड करण्यात आली आहे. पुण्याचे घनश्याम देशमुख यांना “व्यंगचित्रकार” या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सोशल मिडिया पुरस्कार या विभागासाठी नाशिक येथील द ‘फोकस इंडिया’चे संपादक विनायक ढेरे, पुण्यातील अमित परांजपे आणि सांगली येथील विनीता तेलंग या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची निवड झाली आहे.
पुरस्कारांचे हे ११वे वर्ष असून नारद जयंतीला हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान कण्यात येतात. परंतु कोरोना महासाथीमुळे गेली २ वर्षे हा पुरस्कार कार्यक्रम होऊ शकला नाही. म्हणून आता, वर्ष २०२०, २०२१ आणि वर्ष- २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप ‘ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार रूपये २१ हजार रोख व स्मृतिचिन्ह.अन्य तीन पुरस्कार- रूपये ११ हजार रोख व स्मृतिचिन्ह असे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष श्री. अभय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे श्री. मिलिंद कांबळे यावेळी उपस्थित होते.

देवर्षि नारद पुरस्कार दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राचे लक्ष या पुरस्काराने वेधले आहे. आत्तानर्यंत यापूर्वी हे पुरस्कार अनेक मान्यवर व प्रतिष्ठीत पत्रकरांना प्रदान करण्यात आले आहेत. ’ए बी पी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, ’झी२४ तास’चे डॉ. उदय निरगुडकर, ’तरुण भारत’ बेळगावचे संपादक किरण ठाकूर, ’दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ’महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ’लोकसत्ता’ पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ पत्रकार कै. दिलीप धारूरकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व ’आज का आनंद’चे संपादक श्याम अग्रवाल इत्यादी मान्यवर नारद पुरस्काराने सन्मानित आहेत. पुरस्कार प्रदान समारंभास माध्यम क्षेत्रातील पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles