
राहुल सोमकुवर यांनी केले अनाथ सेवा आश्रमात शैक्षणिक साहित्य वाटप
नागपूर: समाजसेवा हे एक व्रत असून कोण कोणत्या रूपाने समाजसेवेचे हे व्रत पूर्ण करेन यावर भाष्य करणे कठीण आहे. सामाजिक बांधिलकी जपत शहरातील समाजसेवक राहुल सोमकुवर सम्राट अशोक नगर, अमरावती रोड यांनी 09 ऑगस्ट रोजी श्री अनाथ सेवा आश्रमास भेट दिली.
नागपूर येथील श्री अनाथ सेवा आश्रम येथे राहुल सोमकुवर यांनी इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या १४ मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. या शालेय सामग्रीत रजिस्टर, वही, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दान केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे कार्य सर्वानी करत रहावे आणि समाजातील वंचित व्यक्तिंना नेहमी मदत करावे असे राहुलचे मत आहे. राहुल हे मुंबईला एका नीम शासकीय कंपनी मध्ये उप प्रबंधक आहेत.