युवा महोत्सवात जे. एस. एम. महाविद्यालयाची पारितोषिकांची लयलूट

युवा महोत्सवात जे. एस. एम. महाविद्यालयाची पारितोषिकांची लयलूट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सलग चौथ्यांदा रायगड दक्षिण विभागाच्या विजेतेपदाचा मान_

अलिबाग : शहरातील २५ महाविद्यालये, ४८३ विद्यार्थी, संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला व साहित्य या मुख्य प्रकारांतील ३२ स्पर्धा, महिनाभराची मेहनत, दिवसभराचे सादरीकरण आणि शेवटी संध्याकाळी जे. एस. एम.! जे. एस. एम.!! असा जयजयकार !!! मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी ५५ व्या युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग येथे करण्यात आले. युवा महोत्सवाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मा.सौ.प्रार्थना बेहेरे व सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मा.श्री.अभिषेक जावकर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मा.श्री. प्रशांत नाईक उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, महाड, माणगाव, रोहा, मुरुड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, सुधागड या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात युवा महोत्सवात सहभाग घेतला. जे. एस. एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकूण २८ स्पर्धांमध्ये सहभाग घेत २३ स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावून सलग चौथ्यांदा रायगड दक्षिण विभागाच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे.

त्यात समूह गीत गायन (प्रथम), लोकनृत्य (प्रथम), वक्तृत्व-मराठी (प्रथम), वक्तृत्व – इंग्रजी (प्रथम), वादविवाद – मराठी (प्रथम), एकांकिका -हिंदी (प्रथम), नाटुकली-मराठी(प्रथम), नाटुकली-हिंदी (प्रथम), एकपात्री अभिनय-मराठी (प्रथम), चित्रकला (प्रथम), कोलाज (प्रथम), व्यंगचित्र (प्रथम), एकपात्री अभिनय- हिंदी (द्वितीय), मूकनाट्य (द्वितीय), पाश्चात्य गीत गायन (द्वितीय), नाट्यसंगीत गायन (द्वितीय), शास्त्रीय नृत्य (द्वितीय), सुगम संगीत गायन (द्वितीय), वादविवाद – हिंदी/इंग्रजी (द्वितीय), तालवाद्यवादन-पखावज (द्वितीय), मेहेंदी (द्वितीय), रांगोळी (तृतीय), कथाकथन-मराठी (उत्तेजनार्थ) या स्पर्धांमध्ये पटकाविलेल्या पारितोषिकांचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एकूण ११ झोनमध्ये सर्वाधिक पारितोषिके पटकावून जे.एस.एम. महाविद्यालयाने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. एखाद्या महाविद्यालयाने युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीत एवढ्या मोठ्या संख्येने पारितोषिके पटकाविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अॅड. दत्ता पाटील लाॅ काॅलेजच्या विद्यार्थ्यांनीही सात स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावून उज्ज्वल यश संपादन केले.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, रायगड जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक कार्यक्रम सल्लागार प्रा.आशुतोष मेहेंदळे ह्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक व दिग्दर्शक ह्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles