
अलिबागच्या विधी महाविद्यालयाचे युवा महोत्सवात यश
अलिबाग: शहरात दि २६ ऑगस्ट २०२२ रोजी विद्यार्थी विकास कक्ष मुंबई विद्यापीठ आणि जे. एस. एम्. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा महोत्सवाच्या रायगड दक्षिण विभागाच्या फेरीत अॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १७ कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. यापैकी ०७ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.
१) कु. आर्शिन राऊत (प्रथम क्रमांक, हिंदी एकपात्री अभिनय)
२) कु. सायली नागोठणेकर (प्रथम क्रमांक, मेहेंदी)
(३) कु प्रतिक पाटणकर (व्दितीय क्रमांक वकृत्व मराठी )
૪) श्रद्धा वैशंपायन ( तृतीय क्रमांक, भारतीय सुगम संगीत गायन व नाट्यगीत गायन)
५) कु सम्युक्ता मेनन आणि आकांक्षा खैरकर (तृतीय क्रमांक वादविवाद इंग्रजी)
६) कु स्वरांगी टोलकर (उत्तेजनार्थ- क्ले मॉडलिंग)
युवा महोत्सवात सहभागी आणि यशस्वी झालेल्या सर्व विदयार्थ्यांचे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड गौतमभाई पाटील तसेच महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. रेश्मा पाटील, उप-प्राचार्या अॅड. निलम हजारे, प्रा. संदीप घाडगे, प्रा. दिपक नागे, प्रा. मेघा पलकपरमबिल, प्रा. समिक्षा म्हात्रे, प्रा. निलम म्हात्रे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले. महाविद्यालयाच्या वतीने प्रा. अॅड. निलम म्हात्रे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले तसेच कु चिन्मय राणे याने समन्वयक म्हणून काम पाहिले.