तुम्ही बारामतीची काळजी करू नका; अजित पवार

तुम्ही बारामतीची काळजी करू नका; अजित पवार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: शहरातील विविध मानाच्या गणपती बाप्पाचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बारामतीचा गड भाजप जिंकेल या भाजपच्या दाव्याविषयी बोलताना बारामतीत माझं काम बोलते. त्यामुळं तुम्ही बारामतीची काळजी करु नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कोण असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

पुण्यातील विविध मानाच्या गणपती बाप्पाचे अजित पवार यांनी आज दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंचे आमचे सरकार असते तर हाच निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याचा निर्णय झाला असता असेही अजित पवार यांनी व्यक्त केलं. त्या काळात कोरोनाचा धोका वाढला होता. म्हणून त्यावेळी माणसं जगवणं महत्त्वाचे होते. म्हणून टास्क फोर्सने दिलेल्या नियमांचे पालन केलं जात होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काही काळ देशात लॉकडाऊन केला होता. दुर्दैवानं महाराष्ट्रात आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळं निर्बंध आणले होते असेही अजित पवार म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles